पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द परिसरात पुन्हा एकदा बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. अवसरी खुर्द इथल्या कौली मळा भागात बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळत असून तो CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे. रात्रीच्या सुमारास बिबट्या मळ्यात फिरताना दिसला. या घटनेमुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.