अहिल्यानगरमधील इसळक, निंबळक परिसरात पुन्हा बिबट्याचे दर्शन झाले आहे. बिबट्या CCTV कॅमेरात कैद झाला आहे. बिबट्या शिकार करण्यासाठी कुत्र्यांच्या मागे लागला होता. गेल्या महिन्यातचं खारे कर्जुने, इसळक, आणि निंबळक परिसरात दोन चिमुकल्यांवर बिबट्याने हल्ला केला होता. आता पुन्हा त्याचं परिसरात बिबट्या CCTV मध्ये कैद झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.