शिरूर तालुक्यातील खंडाळे परिसरात रस्त्यालगत बिबट्याच्या पिल्लांचा वावर आढळून आला आहे. या पिल्लांचे दृश्य प्रवासी शरद नरवडे यांच्या कॅमेऱ्यात कैद झाले आहे. रस्त्याने प्रवास करत असताना नरवडे यांना बिबट्याची पिल्ले दिसून आली. त्यांनी प्रसंगावधान राखत आपल्या कॅमेऱ्यात हा संपूर्ण प्रकार टिपला.