भंडारा जिल्हयातील चांदोरी गावात आज सकाळी बिबट्याच्या वावरामुळे प्रचंड खळबळ उडाली. गावातील रहिवासी मुकेश हातझाडे सकाळी आपल्या बाथरुममध्ये गेले असता, त्यांना तिथे थेट बिबट्या बसलेला दिसून आला. हातझाडे यांनी प्रसंगावधान राखत बिबट्याला बाथरुममध्येच कोंडून घेतले आणि तातडीने वन समितीच्या अध्यक्षांना याची माहिती दिली.