नागपूर जिल्ह्यातील देवलापार गावात जंगलातून आलेला बिबट्या थेट गावातील गोठ्यात शिरला. देवलापार गावातील मनोज सांगाडे यांच्या घरालगत असलेल्या गोठ्यात शनिवारी सकाळी 11 च्या सुमारास बिबट्या शिरल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. बिबट्याला रेस्क्यू करण्यासाठी वनविभागाची टीम पोहोचली, मात्र बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी लागणारी औषधं वेळेवर उपलब्ध नव्हती.