नंदुरबारमधील शहादा तालुक्यातील होळ मोहिदा गावातील भरवस्तीत बिबट्याचा शिरकाव झाला आहे. होळ मोहिदा गावातील एका घरात बिबट्या शिरल्याने गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. बिबट्याच्या हल्ल्यात चार जण गंभीर जखमी झाले असून शहादा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घरात शिरलेल्या बिबट्याचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे.