नागपूर जिल्ह्यात कळमेश्वर तालुक्यातील दहेगाव डोरली (गंगाजी) शिवारात विहिरीत बिबट्या पडल्याची घटना समोर आली आहे. दुंडेश्वर धोटे यांच्या शेतातील विहिरीत सुमारे एक वर्षाचा बिबट्या दिसताच वनविभागाला माहिती देण्यात आली. त्यानतंर तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले. नागपूर येथील जलद बचाव दलाने मोहीम राबत बिबट्याला बाहेर काढले आहे.