येवला तालुक्यातील उंदिरवाडी येथे बोकटे - उंदीरवाडी रस्त्यावर एका मकाच्या शेतामध्ये बिबट्या लपून बसल्याचे प्रत्यक्षदर्शी शेतकऱ्यांनी सांगितले. या संदर्भात वन विभागाला घटनास्थळी बोलावल्यानंतर वन विभागाने तातडीने घटनास्थळी पिंजरा लावला असून ड्रोनच्या माध्यमातून सर्वेक्षण करून बिबट्या पकडण्यासाठी प्रयत्न सुरू केले.. या ठिकाणी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली..मात्र वन विभागाचे रेस्क्यू ऑपरेशन सुरू असताच बिबट्याने मक्याच्या शेतातून धूम ठोकत वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह नागरिकांना गुंगारा दिला.