गडचिरोली जिल्ह्यात बिबट्याची दहशत कायम असून बिबट्याने चक्क गावातील एका बाथरूममध्ये शिरला आहे. या नरभक्षक बिबट्याने अनेक नागरिकांवर हल्ले केले असून पाळीव प्राण्यांनाही ठार मारलं आहे. कुरखेडा तालुक्यातील पुराडा अंतर्गत येणाऱ्या येडापूर येथे वासुदेव कवडे यांच्या घराच्या बाथरूममध्ये बिबट्या आढळला. याची माहिती ताबडतोब वनविभागाला देऊन बिबट्याला पिंजऱ्यात कैद करून सुरक्षित जंगलात सोडण्यात आलं. हा बिबट्या गावातील अनेक नागरिकांवर हल्ले करीत असल्यामुळे जिल्ह्यातून स्थलांतरित करण्यात यावे अशी नागरिकांची मागणी आहे.