मुंबईतील मुलुंड पश्चिम येथील सरदार तारासिंग उद्यानाजवळ असलेल्या साई प्रस्थ येथे बिबट्या आल्याने स्थानिक नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्री उशिरा बिबट्याने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून साई प्रस्थ येथे येऊन कुत्र्याची शिकार केली. या भागात असलेल्या सीसीटीव्ही मध्ये बिबट्या दिसून आल्याने आता नागरीकांची झोप उडाली आहे.