उरण तालुक्यातील रानसई,बारापाडा जंगल परिसरात बिबट्याचा वावर हा चलचित्रीकरण कॅमेर्यात आढळल्याने या परिसरात वन विभागाने सुरक्षिततेसाठी बँनर बाजी करुन गस्त सुरू केली आहे. तसेच परिसरातील नागरिकांना दक्ष राहण्याच्या सूचना वन विभागाने दिल्या आहेत. मात्र मागील वर्षा प्रमाणे याही वर्षी बिबट्याचा वावर आढळल्याने नागरीकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.