लोणावळ्यातील आयएनएस शिवाजी परिसरात रस्ता ओलांडणारा बिबट्या पर्यटकांच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. दुचाकीवरून निसर्गरम्य परिसराचे चित्रीकरण करत असताना अचानक बिबट्याचे दर्शन झाल्याने पर्यटकांची धांदल उडाली. काही दिवसांपासून अंदर मावळ परिसरातही बिबट्या दिसल्याचा दावा ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.