अहिल्यानगरमधील साकूरमध्ये सकाळी बिबट्याने धुमाकूळ घातला. आठवडे बाजाराच्या दिवशी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. संगमनेर तालुक्यातील साकूर इथली ही घटना आहे. चार ते पाच कुत्र्यांनी बिबट्याचा पाठलाग केल्याने बिबटया सैरावैरा पळू लागला. कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे बिबट्याने पळ काढला.