पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील आंबळे परिसरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करणारा बिबट्या अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे. वन विभागाच्या तत्पर कारवाईमुळे ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. शिरूर तालुक्यातील आंबळे गाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.