अहिल्यानगर-पुणे मार्गावर कामरगावजवळ गाडीच्या धडकेनं बिबट्या जखमी झाला. जखमी अवस्थेत तो रस्त्यावर आढळला आहे. गेल्या आठवड्यात कोपरगाव तालुक्यातील येसगाव आणि टाकळी शिवार भागात बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा आणि लहान मुलीचा मृत्यू झाला होता.