राहुरी तालुक्यातील जोगेश्वरी आखाडा इथं शाळेच्या भिंतीवरील बिबट्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. शाळेच्या बाजूलाच शिवजयंतीचा कार्यक्रम सुरू होता. बिबट्याच्या दर्शनाने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. वनविभागाने तातडीने या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.