नाशिकच्या निफाड तालुक्यातील लासलगाव जवळील ब्राह्मणगाव विंचूर येथे बंडू मुरलीधर गायकवाड यांच्या टोमॅटोच्या शेतात रात्रीच्या सुमारास बिबट्याचा मुक्त संचार सुरू असल्याचे मोटरसायकल वरून जात असलेल्या शेतकऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी जोर जोरात आरडाओरड केल्याने बिबट्याने धूम ठोकल्याची घटना घडली यावेळी शेतकऱ्याने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात बिबट्याचा व्हिडिओ कैद करत शेतकऱ्यांच्या माहितीसाठी सोशल मीडियावर टाकल्याने शेतात पाणी भरण्यासाठी दिवसा लाईट राहत नसल्याने रात्री शेती पिकांना पाणी द्यावे लागत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.