नाशिकच्या निफाड तालुक्यातील तारुखेडले इथं बिबट्याचा मुक्त संचार असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. मंगळवारी रात्री तामसवाडी रस्त्यावरील नांदूर मधमेश्वर कालव्याजवळ बिबट्या मुक्तपणे फिरताना दिसला. यावेळी तेथून जाणाऱ्या एका वाहनचालकाने हा संपूर्ण प्रकार आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला.