बागलाण तालुक्यातील निकवेल इथे बिबट्याने धुमाकूळ घातलाय. बिबट्याने मंगळवारी मध्यरात्री गावातील घराबाहेरील परिसरात कुत्र्याची शिकार करण्याचा प्रयत्न केला. ही सर्व दृष्य सीसीटीव्हीत रेकॉर्ड झाली आहेत. या बिबट्याचा वन विभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.