कोकणात बिबट्यांची संख्या वाढत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. चिपळूणमधील कुंभारली घाट परिसरात रस्त्याच्या कडेला फिरणारा बिबट्या वाहनचालकांच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. घाटातून जाणाऱ्या नागरिकांनी गाडीवरूनच या बिबट्याचे छायाचित्रण केले असून हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.