पिंपरी-चिंचवड शहरातील देहूरोड येथील एम्युनिशन फॅक्टरी, दुर्गा देवी टेकडी, रावेत आणि म्हस्के वस्ती या परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार असल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून वनविभागाने तातडीने सर्च ऑपरेशन हाती घेतले आहे.संबंधित परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये बिबट्याची हालचाल स्पष्टपणे कैद झाली आहे. या फुटेजच्या आधारे वनविभागाने बिबट्याचा माग काढण्यास सुरुवात केली आहे.