पारगाव खंडाळा-भोर मार्गावरील अतिट खिंड मार्गावर कान्हवडी येथे नागरिकांना बिबट्याच दर्शन झालं. कान्हवडीच्या डोंगर परिसरात बछड्यासह बिबट्याचा मुक्तसंचार पाहायला मिळाला. रात्री 9 च्या सुमारास साताऱ्यातील खंडाळा तालुक्याच्या हद्दीतील कान्हवडी परिसरात हा बिबट्या दिसला. अक्षय मरगजे हे भोरच्या दिशेने येत असताना त्यांना हा बिबट्या दिसला.. त्यानंतर त्यांनी परिसरातील इतर नागरिकांना बिबट्या असल्याचं कळवलं. बिबट्या दिसताच मरगजे यांनी मोबाईल कॅमेरात त्याचा व्हिडीओ कैद केला.