माथेरान नेरळ घाटात माथेरान मधील काही नागरिक नेरळला येत असताना त्यांना घाटात बिबट्याचे दर्शन झाले. घाटातून खाली उतरत असताना चांगभलं मंदिराच्या खाली रस्त्यावरील कठड्यावर तो आरामशीर बसला होता. कार येताच तिथून त्याने पळ काढला. यामुळे माथेरानमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.