पुणे जिल्ह्यातील शिरूरमधील कर्डेलवाडी येथे बिबट्याचा पुन्हा एकदा वावर वाढल्याचे दिसून आले आहे. शेतकऱ्याच्या गोठ्यात बांधलेल्या कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली असून सर्व थरार कॅमेरात चित्रित झाला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.