वाशिम जिल्ह्यातील वांगी गावात अनिल झाटे यांच्या शेतात बिबट आल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याचा व्हिडीओ प्रमाणात व्हायरल झाला होता. मात्र सदर ठिकाणी वनविभागाच्या पथकाने प्रत्यक्ष पाहणी करून पायांचे ठसे व व्हिडीओ फुटेजमधील हालचालींच्या आधारे संबंधित प्राणी रानमांजर असल्याचे स्पष्ट केले आहे.