नाशिकच्या बागलाण तालुक्यातील निकवेल परिसरात बिबट्याचा धुमाकूळ पाहायला मिळाला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्या कैद झाला असून संध्याकाळच्या सुमारास त्याचा शेतशिवारात मुक्त संचार पाहायला मिळाला. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून वनविभागाकडे बिबट्याला तात्काळ जेरबंद करण्याची ग्रामस्थांची मागणी केली.