पनवेल तालुक्यातील ग्रामीण परिसरात बिबट्या आणि त्याचा बछडा दिसल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. माथेरानच्या डोंगररांगांमध्ये संचार करणारा हा बिबट्या गेल्या काही दिवसांपासून नितळस गाव परिसरात दिसत आहे. गावकऱ्यांनी बिबट्या आणि त्याच्या बछड्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर शेअर केल्यानंतर वन विभागाने तातडीने गस्त वाढवली आहे.