अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी भागात वन्य प्राण्यांचा वावर नेहमीच पाहायला मिळतो. मात्र आता गावाजवळच बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने तात्काळ या बिबट्याचा बंदोबस्त करावा,अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.