शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे,पांढरी वस्ती आणि श्रीनाथ मंदिर परिसरात बिबट्याचे वारंवार दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, नागरिक सायंकाळच्यावेळी घराबाहेर पडण्यासाठी देखील घाबरत आहेत. बिबट्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.