बुलढाणा जिल्ह्यातील आडगाव राजा परिसरात बिबट्याचा वाढता वावर शेतकऱ्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरला आहे. गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे सतत दर्शन होत असल्याने शेतकरी प्रचंड दहशतीत आहेत.