चाळीसगाव तालुक्यातील दरेगाव परिसरात बिबट्याचा धुमाकूळ सुरूच असून, पहाटे शेतात बांधलेल्या गायीवर हल्ला करून तिची बिबट्याने शिकार केली. शेतकरी रतन मोरे हे गुरांना चारापाणी करत असताना त्यांच्या समोरच हा प्रकार घडला, यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.