गोंदियाच्या तिरोडा तालुक्यातील खडकी डोंगरगाव परिसरात बिबट्याची दहशत कायम आहे. 4 वर्षीय चिमुकल्याचा बळी घेणाऱ्या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. बिबट्याला पकडण्यासाठी 4 पिंजरे बसविण्यात आले असून, 50 पेक्षा अधिक वन कर्मचारी गस्त घालत आहेत, गोंदियासह भंडारा जिल्ह्यातल्या रॅपिड रेस्क्यू टीमला देखील पाचरण करण्यात आलं आहे.