शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झालाय भक्ष्याच्या शोधात असताना आज पहाटे पिंजऱ्यात हा बिबट जेरबंद झाला असून गेली महिनाभरात या परिसरात वन विभागाने हा २१ वा बिबट्या जेरबंद केलाय. मात्र अद्यापही परिसरात बिबट्याची संख्या असून या बिबट्यांना हि जेरबंद करण्याच मोठ आव्हान वनविभागा पुढे असणार आहे.