येवला तालुक्यातील अंकाई शिवरातील शिवाजी गरुड यांच्या शेतातील वस्तीवर गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा सतत वावर सुरू आहे. तब्बल आठ वेळा बिबट्या या वस्तीवर आला असून, पाळीव कुत्रा ‘मोती’ मात्र प्रत्येकवेळी जोरदार भुंकून त्याला पिटाळून लावत असल्याचे चित्र दिसून येत आहे.