नाशिकच्या निफाड तालुक्यातील खडक माळेगाव येथे राहुल खंडेराव शिंदे यांच्या शिमला मिरचीच्या पॉलीहाऊसमध्ये बिबट्या शिरल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात चांगलंच दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं. तब्बल पाच तास बिबट्याने याच पॉलिहाऊसमध्ये तळ ठोकला होता, अखेर या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलं आहे.