गेल्या काही दिवसांपासून सावरगाव शिवारात बिबट्याने धुमाकूळ घातला होता. यामुळे शेतात काम करणारे मजूर व शेतकरी त्रस्त झाले होते. या पार्श्वभूमीवर वन विभागाने सावरगाव शिवारात पिंजरा लावण्याचे आदेश दिले होते. सोमवारी रात्री अखेर हा बिबट्या पिंजऱ्यात कैद झाला. बिबट्या जेरबंद झाल्यामुळे परिसरातील नागरिकांनी व शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.