पुणे जिल्ह्यातील घोडेगाव परिसराजवळील गोणवडी भागामध्ये बिबट्याचा वावर असल्याचे नागरिकांकडून अनेकदा वन विभागाला तक्रार करण्यात आली होती त्या अनुषंगाने उसाच्या शेताजवळ वनविभागाने पिंजरा लावला होता. आणि काल रात्री त्या पिंजऱ्यामध्ये अचानक एक बिबट्या येऊन अडकला त्यामुळे गावकऱ्यांनी सुटकेचा विश्वास सोडला आहे. गोनवडी, तालुका -आंबेगाव, जिल्हा-पुणे येथे राहत्या घरांजवळ रोज बिबट्या नागरिकांना दिसत होता.त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.