शिरूर तालुक्यातील भांबर्डे इथल्या वीर वस्ती परिसरात वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात एक बिबट्या जेरबंद करण्यात यश आलं आहे. मात्र, याच परिसरात अजूनही दोन ते तीन बिबटे मोकाट फिरत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून या भागात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून, पाळीव जनावरांवर हल्ल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.