कास पठारावर एका वाहन चालकाला घाटाई देवी परिसरात बिबट्याचे दर्शन झाले आहे. या रस्त्यावर वाहनांची वर्दळ कमी असल्यामुळे अनेक वन्यप्राणी या रस्त्यावर पाहायला मिळतात. रात्रीच्या सुमारास साताऱ्याकडून घाटाई देवीच्या दिशेने निघालेल्या एका वाहनचालकाला रस्त्यालगत बिबट्याचे दर्शन झाले आहे.