देवगड शहरातील तारामुंबरी मिठमुंबरी पुलाजवळ बिबट्या फिरत असल्याची चर्चा अनेक दिवस सुरु होती. रविवारी मात्र बिबट्याचा वावर असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. वनविभागाने याबाबत तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी सध्या होत आहे.