संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळ गावातील घटना आहे. पहाटेच्या सुमारास बिबट्या विहिरीत पडला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. गावातील मनाजी सुपेकर यांच्या शेतातील विहिरीत बिबट्या पडला. गेल्या अनेक दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्यात मानवी वस्तीत बिबट्यांचा संचार पाहायला मिळेत आहे. वनविभागाचे पथक थोड्याच वेळेत घटनास्थळी दाखल होणार असून विहिरीत पाणी असल्याने बिबट्याची देखील प्राण वाचविण्यासाठी धडपड सुरु आहे.