बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील घाटपुरी शिवारात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांचा मुक्त वावर सुरू असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शेतात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोन बिबट्यांचे दर्शन झाल्याने या दहशतीत आणखी भर पडली आहे.