बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात भास्तन शेत शिवारात गेल्या काही दिवसापासून बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळत आहे. त्यामुळे रात्री शेतीला पाणी देण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. शासनाकडून शेतीला दिवसा वीज मिळत नसल्याने रात्री शेतकऱ्यांना आपल्या शेतीला पाणी देण्यासाठी शेत शिवारात जावे लागत आहे. त्यातच आता बिबट्याच्या मुक्त संचारमुळे शेतकऱ्यांचे जीव धोक्यात आला आहे.