मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवास पुन्हा एकदा जीवघेणा ठरत असल्याचं चित्र समोर आलं आहे. रायगड जिल्ह्यातील इंदापूर, कोलाड, लोणेरे आणि माणगाव, महाड परिसरातील सर्व्हिस रोडवर प्रचंड आणि जीवघेणे खड्डे पडले असून रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे