नालासोपाराच्या कळंब बीच समुद्रकिनारी एका रिक्षा चालकाने जीव धोक्यात घालून स्टंटबाजी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या स्टंटबाजीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. स्टंट करत असताना रिक्षा अचानक पलटी झाली.