नागपुरात मेघगर्जनेसह पावसाच्या हलक्या सरी बरसायला सुरुवात झाली. सकाळपासून शहरात ढगाळ वातावरण असल्याने गारवा जाणवत होता, आता पावसाच्या हलक्या सरी बरसायला सुरुवात झाली आहे. गुरुवारी विदर्भातील काही भागात गारपीटसह अवकाळी पाऊस झाला होता. आजदेखील विदर्भात नागपूरसह चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.