सध्या हिंदी सक्तीचा विरोध चांगलाच गाजत आहे. हिंदी सक्तीचं धोरण सरकारने रद्द करावे यासाठी दोन्ही ठाकरे बंधू मैदानात उतरले आणि सरकारला एक पाऊल मागे घ्यावे लागले. अशातच सोशल मीडियावर देखील हिंदीला विरोध होत असल्याचे पाहायला मिळत असताना एका चिमुकलीने आईला मायबोली शिकवली आहे. जेवण टेस्टी नाही तर जेवण छान आहे का असं म्हणायचं, असं ही लहान मुलगी म्हणताना दिसतेय.