केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर नागपूरात दोन महिला अधिकाऱ्यांची धुसफूस लाईव्ह चव्हाट्यावर आली. पोस्टमास्टर जनरल शोभा मधाळे यांची ८ सप्टेंबरला कर्नाटक घारवाडला बदली झाली.नव्या नियुक्तीपर्यंत नागपूरचा प्रभार नवी मुंबईच्या पोस्ट मास्टर जनरल सुचिता जोशी यांना दिला होता.बदलीच्या आदेशावरून मधाळे यांनी न्यायालयात धाव घेतली आणि बदलीवर स्थगिती मिळवली. मात्र या कार्यक्रमाला दोन्ही अधिकारी उपस्थित राहिल्या. मधाळे यांनी जोशी यांच्या हाताला धक्का दिला, साडीवर पाणी सांडले, डाव्या हाताला चिमटाही काढला. हा सारा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.