पिंपरी-चिंचवडमधील निगडी परिसरातील एका नामांकित हॉटेलमधील खाद्यान्नातून पुन्हा एकदा नागरिकांच्या आरोग्याशी गंभीर खेळ सुरू असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. निगडी येथील ‘सावली हॉटेल’मध्ये एका ग्राहकाने मागवलेल्या पावभाजीमध्ये चक्क जिवंत अळी आढळल्याने खळबळ उडाली आहे. हा किळसवाणा प्रकार उघडकीस आल्यानंतर ग्राहकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.