नागपूर खंडपीठाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल 21 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. उद्या होणारी मतमोजणी आता 21 डिसेंबरला होईल. मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले असून, यामुळे आचारसंहिता आणि एक्झिट पोलच्या नियमांमध्येही बदल झाले आहेत.